– कौशल्य क्रीडा मंडळ नागेपलीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील नागेपली येथे कौशल्य क्रीडा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय 30 यार्ड सर्कल क्रिकेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी आमदार दिपक आत्राम, तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर तिसरा पारितोषिक सरपंच लक्ष्मण कोडापे व उपसरपंच रमेश शानगोंडावार यांच्या कडून पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडावार होते. यावेळी नागेपलीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, पंचायत समिती सदस्या सौ.योगीताताई मौहूर्ले, सामाजिक कार्यकर्ते अशोक रापेलीवार, संतोष अग्रवाल, विशाल रापेलीवार, तसेच मंडळाचे अध्यक्ष व सदस्य होते.