– ५ व ६ मार्च २०२२ दरम्यान प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबिर
The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात ५ व ६ मार्च २०२२ दरम्यान प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यातून आलेल्या रुग्णावर या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. सर्चमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णापैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर ५ व ६ मार्च २०२२ दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. यात लहान मुलांचे फाटलेले ओठ, हाताची जुडलेली बोटे, हायपोस्पेडीअस व तसेच मोठ्या व्यक्तींच्या शरीरावर असलेल्या गाठी, जडलेल्या भागाची शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन अशा अनेक प्रकारच्या १९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेसाठी स्पेशलिस्ट सर्जन डॉ. श्रीरंग पूरोहित व त्यांची संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पडण्यात आला.
सर्चच्या सह संस्थापक डॉ. राणी बंग व डॉ. श्रीरंग पूरोहित यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले. सर्चच्या वैद्यकीय चमूतील डॉ. दत्ता, डॉ. मयूरी, डॉ. अंकिता, डॉ. आशुतोष, डॉ. देशपांडे व रुग्णालय प्रशासकीय अधिकारी विनोद भांडेकर, दिनेश येगावार व संपूर्ण कार्यकर्ते यांनी शिबिराची उत्तम व्यवस्था सांभाळली.