माँ दंतेश्वरी दवाखाना सर्च येथे पहिल्यांदा एंडोस्कोपी शिबिराचे आयोजन 

116

– परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन 
The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर : एंडोस्कोपी सारख्या शास्त्रक्रियेकरिता खाजगी दवाखान्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात पैसे घेतात. परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची असते त्यांना हा खर्च परवडत नाही त्यामुळेच अश्या नागरिकांकरिता माँ दंतेश्वरी दवाखाना येथे या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती नोंदवून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध शस्त्रक्रिया अल्पदरात रुग्णांकरिता उपलब्ध करून देण्याचे काम धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च येथील माँ दंतेश्वरी दवाखाना कडून करण्यात येत असते. दरम्यान येत्या ऑक्टोबर महिण्यात सुद्धा याठिकाणी एका मोठ्या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर ला ओपीडी तसेच १४ आणि १५ ऑक्टोबर दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया (एंडोस्कोपी, ” Endoscopy On Wheels”) शिबीर होणार असून या शिबिरा करिता मुंबई येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ पद्मश्री डॉ. अमित मायदेव हे येणार आहेत. ज्यांना अपचन व पोटाचे विकार, ऍसिडिटी, पोटदुखी, कोलायटिस, बद्धकोष्ठता, कर्करोग, कावीळ, अन्न नलिकेचे आजार, पोटात पाणी होणे, रक्ताची उलटी होणे, पोटाचा अल्सर, वारंवार जुलाब होणे, यकृताचे आजार या आजारांपैकी कोणतीही समस्या असल्यास यावर तज्ज्ञ डॉक्टर डॉ. अमित मायदेव यांच्याकडून उपचार करण्यात येईल.
गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश भागात वरील आजार येथील नागरिकांमध्ये आढळून येतात, त्यामुळेच माँ दंतेश्वरी दवाखाना अंतर्गत पहिल्यांदा दुर्बीण द्वारे तपासणी व उपचार (एंडोस्कोपी) करण्यात येणार आहेत. तरीही परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. पूर्वनोंदणी करिता 9403299795, 8668562563 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. किंवा माँ दंतेश्वरी दवाखाना, चातगाव, ता. धानोरा, जि.गडचिरोली  येथे प्रत्यक्ष नोंदणी करू शकता. तरीही परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा आणि शिबीराकरिता आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here