– राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा महासचिव राहुल भांडेकर यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २६ जुलै : ओबीसी, एनटी, वीजे/एनटी प्रवर्गाच्या उन्नत्तीसाठी माहाज्योती स्वयत संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. महाज्योती संस्थेतर्फे ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. पण याचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसत आहे. अजूनही ओबीसी विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत. गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम भाग असल्याने इंटरनेट सुविधा अभावी महाज्योती संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणा बाबत माहिती ओबीसी विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतात त्या अनुषंगाने महाज्योती संस्थेद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ऑनलाइन प्रशिक्षण त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा महासचिव राहुल भांडेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.
तसेच संस्थेने ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन सुरू करण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांना सहा महिन्यापासून अभ्यासाचे साहित्य आणि माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नसल्यचे निदर्शनास आले आहे तर दुसरीकडे खासगी शिकवणी वर्ग ऑफलाइन सुरू असतानाही संस्थेकडून ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस भरतीसाठीही ऑफलाइन प्रशिक्षण आहे. त्यामुळे सर्व प्रशिक्षण ऑफलाइन करावे. लवकरच राज्यात वर्ग ३ व ४ ची पदभरती निघणार आहेत त्या करिता प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांकरिता महाज्योती तर्फे प्रशिक्षण केंद्र सुरू करून प्रशिक्षण देण्यात यावे व विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रशिक्षणासोबतच टॅब व इतर साहित्य लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा महासचिव राहुल भांडेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने आंदोलने करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे. मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे पाठविण्यात आले आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा महासचिव राहुल भांडेकर, निशिकांत नैताम, राहुल वैरागडे, वैभव जुवारे, आकाश सोनटक्के, अजय सोमनकर, विकी दुधबळे, निखिल नागरे, महेश वाघमारे, सुरेश निंबोळ इ. पदाधिकारी उपस्थित होते.