मँजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली व जि. प. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यामधील विविध गावात शाळेचा प्रवेशोत्सव साजरा

197

The गडविश्व
गडचिरोली : मँजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वय देवेंद्र हिरापुरे यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली तालुक्यातील जेप्रा , राजगाटा माल, राजगाटाचक व खरपुंडी , बामणी, आंबेशिवानी आंबेटोला , आणि तालुक्यातील इतर गावामध्ये मागील वर्षापासून ” होलिस्टिक एज्युकेशन टाटा प्रोजेक्ट ” हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेचा प्रवेश दिवस आज २९ जून रोजी साजरा करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली व नवीन भरती पात्र असलेल्या मुलांना मान सन्मानाने शाळेत आणण्यात आले व जे विद्यार्थी शाळेत दाखल आहेत त्यांना शाळेत नियमित येण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .
सदर कार्यक्रम कोणताच विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये , मुलांनी नियमित शाळेत यावे , मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जीवन कौशल शिक्षक देवाजी बावणे , लेखाराम हुलके , विषक शिक्षिका रीना बांगरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here