गडचिरोली : बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला

2316

– घटनेने तालुक्यासह गडचिरोली जिल्हाभरात खळबळ

The गडविश्व
भामरागड : मागील पाच -सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अखेर शेतशिवारात पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना भामरागड तालुक्यातील गेर्रा येथे उघडकीस आली. सदर घटनेमुळे भामरागड तालुक्यासह गडचिरोली जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मीना येरा सिडाम (१७) रा. मन्नेराजाराम ता. भामरागड जि. गडचिरोली असे मृतावस्थेत आढळून आलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे भामरागड तालुक्यासह गडचिरोली जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहें.
प्राप्त माहितीनुसार, मागील पाच -सहा दिवसांपासून मीना ही बेपत्ता होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबातील व्यक्तींनी शोधाशोध केली मात्र मीनाचा थांगपत्ता लागला नाही. याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तीचा शोध सुरू असतांनाच गावाजवळीलच शेतात मीनाची चप्पल दिसली. व जवळपासच एका ठिकाणी खड्डा करून माती टाकल्याचे व त्यातून ओढणी दिसून आल्याने लागलीच पोलीसांना माहिती देण्यात आली व खड्डयातील माती काढली असता मीना चा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह मीनाचाच असल्याची गावकऱ्यांनी खात्री केली. पोलीसांनी पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मात्र सदर घटनेमुळे भामरागड तालुक्यासह गडचिरोली जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. तर गावचे माजी सरपंच यांच्या मुलाचे आणि मृतक मुलीचे प्रेमसंबध असल्याची गावात चर्चा असल्याचे कळते. विशेष म्हणजे माजी सरपंचाचा मुलगा या घटनेनंतर बेपत्ता असल्याचेही कळते. त्यामुळे प्रेम प्रकरणावरून हत्या झाल्याचेही चर्चा होत आहे. मात्र हत्येचे नेमके कारण काय ? हत्या कोणी केली हे अदयाप स्पष्ट झाले नाही. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here