बेरोजगार युवक-युवती व आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना मिळाले निशुल्क दुचाकी / चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण

999

– गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व कौशल्य विकास विभागाचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतीदुर्गम भागातील युवक युवतींना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल व कौशल्य विकास विभाग, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयातील बेरोजगार युवक-युवती व आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांकरीता दुचाकी / चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण निशुल्क आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस मुख्यालय परिसरातील ‘एकलव्य हॉल’ येथे आज ०१ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडला.
गडचिरोली पोलीस दलामार्फत  २ जुलै २०२२ ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगारांकरीता दुचाकी / चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात २० युवती, १०० युवक व १२ आत्मसमर्पीत नक्षल सदस्य असे एकुण १३२ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना दुचाकी / चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देवुन त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढुन देण्यात आले आहे. या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व उमेदवारांना स्व. सपोनि योगेश गुजर यांच्या कुटूंबियांकडुन वाहन चालविण्याचे व वाहतुकीबाबत कायदे व नियम या विषयावरील पुस्तके, वह्या, प्रशिक्षण पुर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र व शिकाऊ वाहन चालक परवान्याचे वाटप करण्यात आले. सन २०२१-२२ या वर्षात गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ४७० युवक, २० युवती व १२ आत्मसमर्पीत नक्षल सदस्य असे एकुण ५०२ उमेदवारांना टू व्हिलर / फोर व्हिलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देवुन परमनंट लायसन्स काढुन देण्यात आले आहे. तसेच पोस्टे स्तरावर ५१९४ युवकांना लायसन्स काढुन देण्यात आले आहे.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ५२ असे एकुण २५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला १८७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, दु-व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण-६४, भाजीपाला लागवड ४४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ३९० व एमएससीआयटी- २०० असे एकुण ३०१२ युवक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा., यांचे उपस्थितीत पार पाडण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे तसेच कौशल्य विकास अधिकारी गौतम चिकनकर, कमल केशव ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक निलेश बांबोळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता गडचिरोली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे / पोमके त्याचप्रमाणे नागरीकृती शाखेतील प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here