पोलीस – नक्षल चकमक : जहाल नक्षलीस कंठस्नान

934

– ठार झालेल्या नक्षलीचा अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभाग
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात पोलिस – नक्षल चकमक उडाली. या चकमकीत डीआरजीच्या जवानांनी इनामी जहाल नक्षलीस कंठस्नान घातले आहे. जवानांनी घटनास्थळावरून नक्षलीचा मृतदेह आणि साहित्यही जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश असे ठार झालेल्या नक्षलीचे नाव असून, तो भैरमगड एरिया कमिटीचा नक्षल कॅडर होता व त्यावर अनेक बक्षिस जाहीर होते.
विजापूर जिल्ह्यातील मिर्तूर पोलिस ठाण्यातील डीआरजी जवानांचे पथक शोध मोहिमे राबवित असतांना गस्तीदरम्यान मंगळवारी रात्री उशिरा माडपाल-कुडमेर जंगलात पोलीस नक्षल चकमक उडाली. सुमारे २ तास दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता जवानांचा वाढत दबाव पाहून नक्षली घटनास्थळावरून पसार झाले. एएसपी पंकज शुक्ला म्हणाले की, सैनिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने असलेल्या नक्षल्यांनी हल्ला केला परंतु डीआरजी जवानांनी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत जवानांनी एका पुरुष नक्षलीस ठार केले. चकमकीत ठार झालेल्या नक्षल्याचा अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभाग होता. तो भैरमगड एरिया कमिटीचा नक्षल कॅडर होता. नक्षली राकेश हा संघटनेत दीर्घकाळ सक्रिय होता आणि अनेक मोठ्या घटनांमध्येही त्याचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here