The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातीन नागरीकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवुन देवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाव्या या उद्देशाने पोलीस दादालोरा खिडकी (एक खिड़की योजना) ५४ पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर सुरु करण्यात आली असून, माहे मार्च २०२२ या महीण्यात पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एकुण २९७७२ नागरीकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
ग्रामभेट योजनेअंतर्गत १६५ ग्रामभेटीमधून ग्रामस्थांनी मांडलेल्या ४५ समस्या निराकरणासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल आहेत. शासकीय योजनेतून नागरीकांचा विकास या कार्यक्रमांतर्गत बाल संगोपन योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दिव्यांग बस प्रवास सवलत योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड, बँक खाते इ. शासकीय योजनेचे एकुण २८,१३८ प्रस्ताव तयार करून संबंधीत विभागांना पाठविण्यात आले आहेत. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये एकुण ०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत २७० प्रस्ताव पाठविण्यात आले. व ७२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच एकुण ६३२ नागरिकांना वाहन परवाना काढून देण्यात आले. महिला जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून ६२ महिला जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवती महिला व पुरुषांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करून, बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान आदिवासी महिला व पुरुषांच्या हाती असलेले कौशल्याला याव मिळावा यासाठी विक्री करीता ५० स्टॉल लावून जवळपास १५ लाख रूपये साहित्याची विक्री झाली.
गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून, १०१ आदिवासी जोडपे व १६ आत्मसमर्पत जोडपे असे एकूण ११७ जोडप्यांचे विवाह पार पाडून वधू-वरांना सोन्याचे मंगळसुत्र, जोडवे, फराळ व संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. आगामी पोलीस भरतीमध्ये स्थानिक युवक-युवतींना नोकरीची संधी मिळावी याकरीता सत्र क्र. ४ मध्ये एकुण २०० युवक-युवतींना ३० दिवसीय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूर कॉम्प्लेक्स (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करून १०१ युवकांना प्रशिक्षण देवून RIR जातीचे कुक्कुट पक्षी, खाद्य व भांडी वाटप करण्यात आले. तसेच १०० महिला व पुरुष यांना पालेभाज्या लागवड प्रशिक्षण देवुन पालेभाज्या किट देण्यात आले व २०१ नागरिकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून व्हिलेज लेव्हल एंटरप्रेनर (VLE) म्हणुन ४५ युवक-युवतींना अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. प्रोजेक्ट कृषी समृध्दी योजनेअंतर्गत १०० शेतकऱ्यांना स्प्रे पंप, बॅटरी तसेच भाजीपाला किट. ३५० शेतकऱ्यांना कृषी बियाणे व भाजीपाला किट तसेच २०० शेतकऱ्यांना लिंबुची झाडे, भाजीपाला किट व मुग बियाणे वाटप करण्यात आले. ऑपरेशन रोशनी अंतर्गत सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे समन्वयातून एकूण १४ महीला व पुरुष रुग्णांची नेत्र तपासणी करुन त्यांचे शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.
अशाप्रकारे माहे मार्च -२०२२ मध्ये प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र २७०, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध योजना १३३५६, बँक खाते उघडून देणे ३३२४, विविध प्रकारचे दाखले ११४५८, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ०२, रोजगार व व्होकेशनल ट्रेनिंग ४५१, प्रोजेक्ट कृषी समृध्दी ६५०, प्रोजेक्ट शक्ती १३ इतर उपक्रम २४८ असे एकूण २९७७२ नागरीकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच माहे जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ पर्यंत एकूण ५८४०६ नागरीकांना लाभ मिळालेला आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे उपक्रम राबविण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी व
अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.