पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

317

The गडविश्व
मुंबई : आता चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. केंद्र सरकारने तसे धोरण आखले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार्जिंग स्टेशन्सच्या संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले की, काल कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु पाणी आहे म्हणून आहे दिसेल तिथे कांडे दाबत बसू नका. ज्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्यांना आम्ही 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेला ऊस वेळेत गेला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कालपासून भाजप, वायएसआर, सपाचे 15 खासदार हे बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील विकास कामांची पाहणी करीत आहेत. विविध पक्षाचे 15 खासदार बारामती दौऱ्यावर आहेत. यात भाजप, बसपा, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि सपा या पक्षाचे हे खासदार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here