पेटतळा ग्रामपंचायत समितीचा शेजारी गावातील दारूबंदीसाठी पुढाकार

213

– पेटतळा येथे ग्रापं समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली : गावात अवैध दारूविक्री बंद असली तरी आसपासच्या गावात हा अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून शेजारील गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय पेटतळा ग्रापं समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
चामोर्शी तालुक्यातील पेटतळा ग्रामपंचायत कार्यालयात समितीचे अध्यक्ष सरपंच शोभा कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच ओमप्रकाश बर्लावार, मुख्याध्यापक कुनघाडकर, पोलिस पाटील जयेंद्र बर्लावार, ग्रापं सदस्य नितेश गेडाम, प्रवीण गेडाम, आरोग्य सेविका सुरमवार , आशा वर्कर मीराबाई येरेवार, उंदीरवाडे, विशाखा मेश्राम, तंमुस अध्यक्ष मणिराम बर्लावार, सुधाकर पुराम, सुनीता शेट्टीवार, ग्रामसेवक कन्नाके प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत ग्राम समिती पुनर्गठित करण्यात आली. मुक्तिपथ गावसंघटनेचे कार्य, सदस्य कोण आहेत, ग्रामपंचायत अधिनियमानुसार दारू व तंबाखू विक्रीबंदी साठी कोणते कायदे आहेत, ग्रामपंचायतला कोणते अधिकार आहेत आदींची माहिती देण्यात आली. गाव संघटनेला गावातील अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करण्यासाठी गरजेनुसार मदत करण्याचे ठरविण्यात आले. ग्रामपंचायतसाठी मुक्तिपथ कडून दिलेल्या मार्गदर्शी काम सजवून सांगण्यात आले. गावातील दारू व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना नोटीस देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here