पुष्करमधे भाविकांची ११ व्या दिवशीही लक्षणीय वाढ

213

– राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेसह खासदार, आमदार यांची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा येथील प्राणहिता नदीकाठी पुष्करचे आयोजन १२ वर्षांनंतर पार पडत आहे. आज मेळाव्याच्या ११ व्या दिवशी लक्षणीय वाढ दिसून आली. पुष्करचा फक्त एक दिवस बाकी असल्याने भाविक आता गर्दी करू लागले आहेत. भाविकांबरोबरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांनी उपस्थिती दर्शविली.
सिरोंचा येथे पुष्कर निमित्त विविध राज्यांमधून लाखो भाविकांनी आत्तापर्यंत उपस्थिती दर्शविली आहे. पवित्र स्नानासाठी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या पुष्कर मेळाव्याची सांगता तोंडावर आली असताना भाविकांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून तातडीने आवश्यक सर्व सोयीसुविधा सिरोंचा येथील दोन्ही घाटावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवश्यक प्रयत्नातून या घाटांचा विकास करण्यात आला असून भाविकांसाठी अडचणी येऊ नयेत म्हणून सावली निर्माण करण्यापासून ते जाण्या येण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था उभारण्यात आली आहे. या वर्षी झालेल्या सोयी सुविधामूळे भाविकांची पसंती सिरोंचा घाट असून याबाबत कित्येक भाविक समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया विविध माध्यमांद्वारे आल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन

आयुष्यमान भारत अंतर्गत नागरिकांसाठी तालुकास्तरावरती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील आरोग्य शिबीराचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here