पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इंदाराम येथे शुभारंभ

405

– जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बालकाला पोलिओचा डोस देत केला शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात प्लस पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. आज अहेरी तालुक्यातील इंदाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थतित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षांनी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओ चा डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी सरपंचा सौ.वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच व विद्यमान ग्रा.प.सदस्य गुलाब सोयाम, डॉ.विशाल येरावार, डॉ.गणेश लाड्स्कर, कु.कावनपूरे, मडावी, गलबले, आशा वर्कर आत्राम, सिडाम, कूळमेथे, रोशन शामलवार कर्मचारी उपस्थित होते. इंदाराम येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ६९ बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here