पदोन्नती व पदस्थापनेचा बोगस आदेश निर्गमित करणारे अटकेत : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

515

The गडविश्व
मुंबई : अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देऊन त्यांना अन्य पदावर पदस्थापना देण्याबाबतचा बोगस आदेश दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी व्हॉट्सॲपद्वारे निर्गमित झाला होता. बोगस आदेश निर्गमित झाल्याचे कळताच 7 जानेवारी 2022 रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. त्यात संदेश चव्हाण आणि त्याचा साथीदार उमेश यांना अटक करण्यात आली असून हे दोघेही कारागृहात असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, विजय उर्फ भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here