पं . स. सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते ताटीगुडम येथे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

294

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ताटीगुड्म येथे गोंडावाना क्रिकेट क्लबच्या वतीने ग्रामीण क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व द्वितीय पारितोषिक पं .स.सभापती भास्कर तलांडे व जि.प.सदस्य अजय नैताम असे दोन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहे.
आज सदर स्पर्धेचा शेवटचा सामना झाला. या स्पर्धेत युवा सि.सि.इंदाराम या संघाने प्रथम व गोंडावाना सि.सि.ताटीगुडम या संघाने द्वितीय पारितोषिक पटकाविले. आज सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते प्रथम बक्षीस तर द्वितीय बक्षिस अहेरीचे पं.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाराम मडावी, वासुदेव सिडाम, दिवाकर आलाम, नामदेव पेंदाम, इरशाद शेख, आदि मान्यवंर उपस्थित होते.
यावेळी मंडळचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विजेता संघाचे प्रवीण कोरेत, सुनील मडावी, अजय तलाडे, कालिदास आत्राम, अमोल आत्राम, उमेश कोरेत, अरुण आलम, रितेश कोरेत, करण वेलदी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here