पं. स. गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन

320

The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : स्थानिक पंचायत समिती येथे आमदार डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव चे औचीत्य साधुन केंद्रीय पुरस्कृत प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत उत्कृष्ठ ग्रामपंचायत सचिव, सरपंच, तथा लाभार्थी सत्कार सोहळा तसेच ध्वज वितरण सोहळा, स्वच्छता मोहिम,डेमो- हाउस चे उदघाटन, सेल्फी उपक्रमाचे आयोजन आज १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
यावेळी महाआवास अभियान २.० प्रधानमंत्री, राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये विहीत वेळेत घरकुल पुर्ण करण्याऱ्या ग्रामपंचायत, सचिव, सरपंच, लाभार्थिचा सन्मान चिन्ह देऊन आमदार डॉ. होळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव निमीत्त स्वच्छता मोहिम, ध्वज वितरण वृक्षारोपण, डेमो-हाउस चे उदघाटन व अमृत महोत्सव सेल्फी चे अनावरण करण्यात आले.
सदर सत्कार सोहळा व उपक्रमाकरीता आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षते खाली माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलासराव दशमुखे, गट विकास अधिकारी धनंजय साळवे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी फरांडे, कृषी अधिकारी पी. पी. पदा, .के.जी.बोपणवार, विस्तार अधिकारी अमोल भोयर , कार्यालयीन सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग. सचिव, सरपंच, नागरीक, महिला इ. प्रामुख्याने हजर होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन जि.प.प्राथ.शाळा काटली च्या शिक्षीका श्रीमती आकरे, पंचायत समिति गडचिरोली समन्वयक प्रदिप जे.बरई यांनी केले. जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील शालेय विदयार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. व विस्तार अधिकारी (पं) के.जो. बोपणवार
यांनी आभार मानले. अधिक्षक कु.पातकमवार, वि.अ.सांख्यीकी बेडके, स्था. अभियांत्रीकी अनमोल चंदनखेडे, घरकुल ऑपरेटर सुरज खोब्रागडे, इ. नी आयोजनार्थ भुमीका बजावली. माजी सभापती इचोडकर यांनी वंदे-मातरम गिताने सदर कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here