नियंत्रण सुटल्याने दुचाकीची झाडाला जबर धडक : दुचाकीस्वार जागीच ठार

1121

– मरेगाव- चांभार्डा मार्गावरील घटना
गडविश्व
अमिर्झा : मरेगाव येथून काम आटोपून स्वगावी चांभार्डा येथे जात असतांना वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसून अपघात झाला यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटना 11 एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दिलीप संभाजी किरंगे रा.चांभार्डा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिपील किरंगे हे मरेगाव येथून एमएच ३३ वाय ७२५६ क्रमांकाच्या दुचाकीने काम आटोपून स्वगावी चांभार्डा जात होते. दरम्यान मरेगाव नजीकच्या एका वळणावर दिलीप यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकीची जबर धडक बसून अपघात झाला. यात दिलीपला जबर मर बसल्याने जागीच ठार झाला.
घटनेची माहिती तात्काळ आरमोरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here