निमगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता

179

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ८ नोव्हेंबर : तालुक्यातील निमगाव येथे काकड आरतीची परंपरा मागील ३७ वर्षापासून सुरू करण्यात आली व ती सातत्याने म्हणणे सुरू आहे. त्या आरतीचा आज ८ नोव्हेंबर ला समारोप करण्यात आले. निमगाव येथे ही जुनी परंपरा आहे, ती सुरू ठेवण्यासाठी निमगाव येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक देवरावजी मुंगरकर महाराज, केशव मेश्राम ,पांडुरंग मेश्राम, बाबुराव होळी, वासुदेव शेडमाके, मनीराम वरखडे, सुधाकर जानेपल्लिवार, आनंदराव वरखडे, अशोक वरखडे, तुळशीदास कुकडकर ,रामभाऊ भुरसे ,तुळशीदास कुकडकर, दिलीप वासेकर, भगवान खोब्रारागडे, पुरुषोत्तम राजगडे, बालाजी चापडे ,डॉक्टर रामटेके विश्वनाथ वरखडे , रामदास कोवे, चेतन सुरपाम उपसरपंच, शालिकराम बावनथडे, मारुती कुंमरे, संतोष मडावी आदि गावकरी यांच्या सहयोगातून काकड आरतीची परंपरा सुरू आहे. ती परंपरा सतत सुरू राहून काकड आरतीचे ज्योत नेहमी पेटत राहील अशी समस्त गावकरी यांची भगवंत चरणी प्रार्थना करून गोपालकाला करून समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here