– नव्याने पुलबाधकामाची मागणी तिस वर्षापासुन प्रंलबित
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा : तालुक्यातील निमगाव आणि गडचिरोली तालुक्यातील मोहटोला बेलगाव या मार्गावर एक छोटासा नाला असून या नाल्यावर मागील चाळीस वर्षांपूर्वी पुल रपट्याप्रमाने तयार करण्यात आलेला आहे. सध्या तो फुटलेला , तुटलेला, भेगा पडलेला व पुलावर मोठ मोठे खड्डे तसेच लोखंडी साखळी बाहेर उभ्या असुन पुलाची उंची खूपच खाली असल्याने या छोट्या नाल्याच्या रपट्यावरुण पावसाळ्यात सतत पाणी पुलावरून वाहत असल्याने येथील पुल पूर्णपणे छतिग्रस्त झालेला आहे. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे या पुलावरून, रस्त्यावरून प्रवास करणे अवघड असुन जिवाला व वाहनाला धोकादायक असुनही पुलावरून, रस्त्यावरून लोक आपला स्वतःचं जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याने सदर नाल्यावरील पुलाच्या बांधकामाकडे नागरिक मागील तीस वर्षापासून डोळे लावून प्रतीक्षा करत असतांनाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, शालेय विद्यार्थी, कर्मचारी आणि गावातील लोकांची सदर पुल लवकरात लवकर बनवण्याची मागणी तिस वर्षापासून धुळखात असल्याचा आरोप परिसरातील लोकांनी केला आहे.
धानोरा तालुक्याची व गडचिरोलि तालुक्याची सीमा जोडनारा मोहटोला गावच्या पाल नाल्यावरील पुल हा अनेक दिवसापासून दुर्लक्षित आहे सदर पुल नव्याने बांधण्याची मागणी तिस वर्षापासुन परिसरातील लोकांनी केलेले असताना सुद्धा वारंवार या पुलाकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. सदर पूल बांधकाम करण्याकरिता मंजूर असल्याचे प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधिच्या वतीने वारंवार सांगण्यात येत असले तरी मात्र परिसरातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि कर्मचारी यांची घोर निराशा करण्यात येत आहे. मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते अनेक प्रवासी ये-जा करतात तसेच धानोरा तालुक्यातील शेतकरी गडचिरोली तालुक्यातील अनेक गावात जातात आणि गडचिरोली तालुक्यातील अनेक शेतमजूर शेतकरी तालुक्यातील हिच सीमावर ओलांडून यावे लागते त्यामुळे सर्वांकरिता हा पुल अतिशय महत्त्वपूर्ण आहे परंतु मागील तीस वर्षापासून या पुलाच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील लोकांची मोठी गैरसोय होत आहे .सदरमार्ग पावसाळ्यात प्रवास करने जोखमीचा आहे. परंतु इतर ऋतूमध्ये सुद्धा पुलावरून रहदारी करण्यास खूप कठीण जात आहे. परिसरातील लोकांना ये-जा करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे तसेच धानोरा तालुक्यातील अनेक गावातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी याच पुलाचा आधार घ्यावा लागते. त्यामुळे धानोरा तालुक्यातील निमगाव, मासरगाटा, बोरी, निमनवाडा, कन्हाळगाव, महावाडा, मोहलि, चिंगलि अशा अनेक गावांना गडचिरोली ये-जाण्याचा हा अगदी जवळचा मार्ग असल्याने वेळेचि बचत आणि पैशाची बचत होत असते. तसेच गडचिरोली तालुक्यातील मोहटोला , बेलगाव, मौशीखांब, मरेगाव, वडधा, मरेगाव, रानखेडा, मुरमाडी अशा अनेक गावांना धानोरा येथे ये-जा करण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग असल्याने सर्वांच्या दृष्टिकोनातून हा मार्ग सोयीचा आहे तसेच भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी, मुलांना शाळेत , कर्मचाऱ्यांना ये-जा करन्यासाठी, वारंवार पुल ओलांडून जावे लागते तसेच बैलबंडी , शेतकरी , शेतमजूर या सर्वांनाच पुलावरुण वारंवार प्रवास करावे लागते.
पावसाळ्यात पुलावरुण वाहनाऱ्य पावसाने शेवाळ तयार झाले की पुलावरुण प्रवास करणे कठिण असते. कोणतेही वाहण काढणे म्हणजे जिवावर उदार होने असेच आहे. अशा परिस्थितीत शेकडो लोक पुल ओलांडून जातात. पण या स्थितिची कोणालाच माहीति नसावि त्यामुळेच येथिल पुल नव्याने बांधकामाकडे दुर्लक्ष होत असावे.
माञ दलालाचे पोट भरन्याकरिता नाममाञ पुलाची डागडुजी करुण मोकळे होतात .पण कोरोनाच्या कालावधित दोन वर्षात कोणत्याही प्रकारची दुरुस्ताई न झाल्याने पुल सध्या शेवटच्या घटका मोजतोय . मागिल तिस वर्षापूर्वी पासुन समस्याग्रस्त पुलाचे काम नव्याने त्वरीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सध्या पुलाला मोठमोठया भेगा पडलेल्या आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत .पुलाचा स्लाँप उखडुन लोखडी सळाखी बाहेर उभ्या आहेत त्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जिवघेनारे व वाहनाला धोका पोहचविनारे आहेत. सदर पुलाबाबत जनतेची होणारी फसवणूक थांबून नव्याने पुलाचे बाधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.