नवरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चे अनावरण

168

The गडविश्व
गडचिरोली, २२ नोव्हेंबर : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील बस स्टॉप परिसरात सर्व नागरिकांच्या सहमतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चे अनावरण २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी सुमारे २५० घरांची वस्ती आहे. या छोट्याश्या गावामधे ५० नवबौध्द बांधवांची घरे असून बौध्द बांधवांच्या पुढाकाराणे ग्रामपंचयतमध्ये ठराव घेऊन नवरगाव येथील बस स्थानकासमोर सर्व नागरिकांच्या सहमतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चे अनावरण करण्यात आले.
या चौकाचे अनावरण करण्यासाठी दादाराव चव्हाण, प्रमोद गोवरधन, डायमंड वाकडे, अरविंद दुर्गे, शुभम वनिकर, लोमेश मेश्राम, संतोष मेश्राम, वामन मेश्राम, गोकुळ दुर्गे,उपसरपंचा करिश्मा वणिकर, सुरेश वणीकर, बंडू झाडे, कपिल दुर्गे, संदीप बोलीवर, ताराचंद बोलीवर, माणिक गेडाम, शामाबई बांबोळे, देवराव वाकडे आदी बौध्द बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here