नक्षल्यांनी सीएएफ जवानाची केली धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

697

– घटनास्थळी आढळली नक्षली पत्रके, गंगालूर एरिया कमिटीने स्वीकारली हत्येची जबाबदारी
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षल्यांनी एका सीएएफ जवानाची अपहरण करून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली आहे. हत्या केल्यांनतर जवानाचा मृतदेह नक्षल्यांनी रस्त्यावर टाकून दिला. व मृतदेहाजवळ एक पत्रकही फेकले. नक्षल्यांच्या गंगालूर एरिया कमिटीने ही घटना घडवून आणली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील धानोरा येथील रहिवासी अर्जुन कुडियम सीएएफ २२ व्या बटालियनमध्ये तैनात होते. जवान गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने १ महिन्यापूर्वी सुट्टीवर घरी आले होते. घरी राहून ते उपचार घेत होते. या दरम्यान नक्षल्यांनी जवानाचे अपहरण केले होते.
घटनेची माहिती होतात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गंगालूर एरिया कमिटीने या हत्येची जबाबदारी स्वीकारून एक पत्रक मृतदेहाजवळ टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here