नक्षल्यांनी केली सरपंचाच्या पतीची गोळी झाडून हत्या

626

– लग्न समारंभात गेले असता केली हत्या
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरच्या कुत्रु पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नक्षल्यांनी सरपंचाच्या पतीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतक हे आडवली गावच्या सरपंचाचे पती आहे. ते काल एका लग्न समारंभासाठी गावी गेले होते दरम्यान ग्रामीण वेशभूषा धारण केलेल्या नक्षल्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. धनश्याम मांडवी असे हत्या करण्यात आलेल्या सरपंचाच्या पतीचे नाव आहे. ते काँग्रेसचे कार्यकर्ता होते.
धनश्याम मांडवी हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशय नक्षल्यांना होता. काल बुधवारी सायंकाळी घनश्याम ताडमेर येथे एका लग्न समारंभात गेला असता याची माहिती नक्षल्यांना मिळाली. त्यानंतर काही नक्षली गावात पोहचले व लग्न समारंभात धनश्यामवर गोळी झाडून हत्या केली. यावेळी लग्न समारंभात चेंगराचेंगरी झाली. हत्या केल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसडीओपी अभिनव उपाध्याय यांनी सांगितले. ते गावकऱ्यांची चौकशीही करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here