नक्षल्यांनी किराणा दुकानदाराची केली हत्या

498

– नक्षल्यांकडून हत्या सत्र सुरूच
– काही दिवसांपूर्वीहि नक्षल्यांनी केली होती एकाची हत्या

The गडविश्व
बीजापूर : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्हातील कुटरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्य केतूलनार येथे नक्षल्यांनी काल सोमवारी रात्रोच्या सुमारास एका किराणा दुकानदाराची हत्या केल्याची घटना घडली. जगत सोरी (32) असे हत्या करण्यात आलेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जगत सोरी हा रात्राच्या सुमारास घरात झोपून असतांना नक्षल्यानी घरात येवून धमकावले आणि घरातून बाहेर नेत होत. यावेळी घरातील इतर सदस्यांनी त्यांना विरोध केला. दरम्यान नक्षल्यांनी त्याला जबरजस्ती घरापासून इतरत्र दुर नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येचे कारण अदयाप कळू शकले नाही. सदर घटनेची माहीती ग्रामस्थांनी व परिवारातील सदस्यानी कुटरू पोलीस ठाण्यात दिली. घटनेचा अधिक तपाास सुरू असून तपासानंतरच हत्येचे नेमके कारण कळू शकनार आहे असे कुटरू चे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here