– दोन झाडांच्या मधोमध पेरून ठेवला होता आयईडी, पोलीस दलाने केला निष्क्रिय
The गडविश्व
बिजापूर : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात घातपाताच्या उद्देशाने दोन झाडांच्या मधोमध पेरून ठेवण्यात आलेला आयईडी बॉम्ब निष्क्रिय करत नक्षल्यांचा घटपाताचा मोठा कट उधळण्यात पोलीस दलास मोठे यश आले आहे.
बिजापूर जिल्ह्यात बासागुडा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल हे संयुक्तरित्या नक्षलविरोधी मोहीम राबवित असतांना बासागुडा ते सरकेगुडा दरम्यान रस्ता उघडण्याचे काम करीत होते. अभियान राबवून परत असतांना कोत्तागुडा वस्तीपासून ४०० मीटर अंतरावर नालीजवळील दोन झाडांच्या मध्यभागी झाडाच्या सावलीत मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने आयईडी बॉम्ब पेरून ठेवला होता. परंतु जवानांनी सतर्कता बाळगल्याने नाल्याच्या बाजूला एक तार दिसून आल्याने बॉम्ब शोधक पथकाने पेरलेले आयईडी स्फोटक निष्क्रिय केले. यामुळे मोठा अनर्थ टळला तर नक्षल्यांचा घातपाताचा मोठा कट उधळण्यात पोलीस दलास यश आले आहे.