धानोरा येथे सीआरपीएफ शौर्य दिन उत्साहात साजरा

252

The गडविश्व
धानोरा : येथील सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या मुख्यालयात शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळू सीआरपीएफ शौर्य दिनानिमित्त बटालियनने १९६५ मध्ये गुजरातमधील रन ऑफ कच्छ येथील सरदार पोस्टवर शत्रूंशी लढताना देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी कमांडेंट जी. डी.पंढरीनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाची सुरुवात क्वार्टर गार्ड मधे सलामी घेऊन झाली.  त्यांनी सर्वप्रथम या दिवसाचे महत्त्व विशद केले.
जवानांना संबोधित करताना ११३ बटालियनचे कमांडेंट जी.डी. पंढरीनाथ म्हणाले, “९ एप्रिल १९६५ रोजी सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनच्या छोट्या तुकडीने रन ऑफ कच्छ, गुजरातमधील सरदार पोस्टवर पाकिस्तानी ब्रिगेडने केलेला हल्ला हाणून पाडला. ह्या हल्ल्यात ३४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते आणि ४ जणांना जिवंत अटक करण्यात आली होती. लष्करी लढाईच्या इतिहासात आतापर्यंत कधीही इतक्या लहानशा तुकडीने पूर्ण पायदळ ब्रिगेडशी लढा दिला नाही. या संघर्षामधे ६ शूर सीआरपीएफ जवानांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले. दलातील शूर जवानांची गाथा दरवर्षी ९ एप्रिलला शौर्य दिवस म्हणून साजरी केली जाते.
अदम्य शौर्य, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक, सीआरपीएफ ‘शौर्य दिवस’ बद्दल सर्वांना अभिवादन आणि आपल्या शूर शहीदांना सलाम. ‘शूर शहीदांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही.’
याशिवाय यावेळी सैनिकांमध्ये खेळ व शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जी. डी. पंढरीनाथ आणि बटालियनमध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्या सैनिक व अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंग, एम.जे. रीजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य पुरोहित व इतर सर्व अधिकारी व सर्व जवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here