The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० सप्टेंबर : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गुरुवार २८ सप्टेंबर ला “माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पी. वी. साळवे, पी. बी. तोटावार , एस एम रत्नागिरी, कोल्हटकर , कु.रजनी मडावी, प्रा रश्मी डोके उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तोटावा यांनी माहिती अधिकार अधिनियम याबद्दल माहिती दिली. डी टी. कोहाडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कु.यामिनी सोनुले तर आभार कु. प्रतीक्षा मडावी हिने केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्वच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
