The गडविश्व
ता.प्र / धानोरा : धानोरा येथे उन्हाळ्यात कोणीही वाटसरू तहानलेले राहू नये हे लक्षात घेऊन सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी. पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ ११३ बटालियन ने स्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन धानोरा येथे रस्त्याच्या कडेला प्याऊ ची व्यवस्था केली असून सदर प्याऊ चे लोकार्पण काल ९ मे रोजी धानोरा नगरपंचायतचे उप सभापती ललित बर्चा यांच्या हस्ते करण्यात आले.
बूंद करे बूंदों के “जल् “- लोष का शोर !!
हर घर बचे पानी ..यही है सभी का जोर ‼️ ️
यावेळी सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी. पंढरीनाथ, द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंग, उप कमांडंट प्रमोद सिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ.दित्य पुरोहित, धानोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुधाकर देडे व उपनिरीक्षक अनिल बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेणेगुरे, जमीर कुरेशी, मुस्ताक कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व जवान उपस्थित होते. सीआरपीएफ ११३ बटालियनने उभारलेल्या प्याउचे धानोरा येथील जनतेने कौतुक केले आहे.