The गडविश्व
ता.प्र / धानोरा : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागात द्वारा सामूहिक पर्यावरण संवर्धन शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण, रा से यो कार्यक्रम अधिकारी , प्रा ज्ञानेश बनसोड यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा ज्ञानेश बनसोड यांच्याबरोबर सामूहिक पर्यावरण संवर्धन शपथ ग्रहण केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ पठाड़े व प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानेश बंसोड यांनी तर आभार डॉ.दामोदर झाडे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील प्रा डॉ राजू किरमिरे, प्रा डॉ हरीश लांजेवार, प्रा डॉ संजय मुरकुटे, प्रा नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. सचिन धवनकर, प्रा प्रवीण गोहने, प्रा डॉ गणेश चुधरी, प्रा डॉ संजय मुरकुटे, प्रा गीताचंद्र भैसारे, प्रा डॉ प्रियंका पठाडे, प्राध्यापक भाविकदास करमनकर, प्राध्यापक विराग रणदिवे व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
