धानोरा येथील महाविद्यालयाचे ‘युवा उत्सव 2022’ मध्ये सुयश

222

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ३० सप्टेंबर : धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री. जे .एस .पी. एम. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे नेहरू युवा केंद्र तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे द्वारा आयोजित युवा उत्सव २०२२ मध्ये सामूहिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश मिळविल्या बदल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नेहरु युवा केंद्र तथा गोडवाना विद्यापिठ अंतर्गत आयोजित सामूहिक सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या समूह नृत्यास तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तर फोटोग्राफी या स्पर्धेत कुमारी करीना रेमाजी वरवडे हीने द्वितीय क्रमांक मिळविला. सामूहिक सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत पारितोषिक विजेत्या समूहामध्ये कुमारी युतेश्वरी गावडे, कुमारी अपेक्षा शेडमाके, सुहानी पदा, उज्वला उईके, गुडिया आदे, तृप्ती समरथ, सायली तुलावी ,दिव्या उसेंडी या विद्यार्थिनीचा सहभाग होता.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तथा सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रियंका पठाडे ,प्राध्यापक डॉ. विना जंबेवार ,प्राध्यापक प्रशांत वाळके यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. सदर विजेत्यांचे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे सर्व माननीय पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here