धानोरा : माळंदा येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी

157

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : तालुक्यातिल जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ए.एन.बढई यांनी भुषविले. त्यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून व्दिप प्रज्वलित कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
यावेळी प्रास्ताविक संतोष मारकवार, संचालन लोमेश धूडसे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकत भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुस्तकाचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु.ए.बी.शेख, जि.एन.ठमके, ए.एस.संतोषवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार सी.डी.गद्देवार यांनी मानले. तसेच कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here