धानोरा महाविद्यालयाचे महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धेत सुयश

286

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ८ ऑक्टोबर : येथील गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन महिला व्हाॅलिबाॅल स्पर्धेत धानोरा येथील श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयाच्या महिला संघाने बल्लारपूर येथील एम. जे. एफ महाविद्यालयाच्या संघाला पराभूत करून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर विजयी संघात कु श्रद्धा मोहुर्ले, कु रेणुका मडावी, कु स्नेहा कुमरे, कु निरशो गावडे, कु खिलन खोतवार, कु धुलेश्वरी हलामी, कु स्वाती उसेंडी, कु प्रांजली कोरेटी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून विजयी घोडदौड कायम ठेवली. या नेत्रदिपक कामगिरीबद्दल श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष सौ. आशीताई रोहनकर, सचिव सौ मीनलताई सहानी, सहसचिव सौरभदादा मुनघाटे, तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी , शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ .संजय मुरकुटे, प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच इतरही स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here