धानोरा तालुक्यातिल शेतकरी, पशुपालक यांनी “लम्पी” आजाराला घाबरू नये : बाळासाहेब काळे

211

– ५२ हजार लस तालुक्याला प्राप्त, ४ अधिकाऱ्यावर २०६ गावाचा भार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १९ ऑक्टोबर : आधीच संपूर्ण धानोरा तालुका नक्षलग्रस्त व विकासासाठी कोसो दूर असून यातच मोठे आवाहन कोरोना नंतर मुक्या जनावरांना लम्पी या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी, पशुपाल लोकांनी भीती न बाळगण्याचे काही कारण नाही आपल्या पशुची गोठ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावे काही आजार दिसताच तात्काळ जवळील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा जेणे करून या आजारावर पशुसाठी वेळेवर उपचार होऊन आळा बसण्यास मदत होईल. सध्या स्थितीत लम्पी आजाराची साथ असून तालुक्यात असे कोणतेच रुग्ण नाही त्यामुळे कोणत्याही आजारापासून भीती बाळगण्याचे कारण नाही असे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) बाळासाहेब काळे यांनी शेतकऱ्यांना पशुपालकांना आवाहन केले आहे.
संपूर्ण तालुक्यात १६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत यामध्ये २०६ गावांचा समावेश आहे तर विसाव्या पशुगणनेनुसार ५५ हजार ८०० जनावरांची संख्या (गायवर्गीय) आहे, पशुवैद्यकीय दवाखाने याप्रमाणे ,चातगाव मध्ये सहा गावे असून १८०० लस प्राप्त झाले आहे, ,मेंढाटोला सहा गावात १५००, कारवाफा मधे १६ गावात ४४००, गट्टा तेरा गावात ३५००, पेंढरी तेरा गावात ४२००, झाडापापडा ११ गावात २७००, रांगी, व समाविष्ट सात गावात ३२०० मोहली व येणारे आठ गावात ३२००, दूधमाळा ११ गावात ३१००, गोडलवाही व समाविष्ट गावे अकरा गावात ३७००, येरकड मधील १४ गावात १८००, सुरसुंडी व येणारे २७ गावात ४९००, मुरूमगाव येथील १६ गावात ३६००, सावरगाव व इतर ६ गावात ३६००, सावरगाव व समाविष्ट सहा गावे ३२००, धानोरा व इतर सतरा गावे लस ४५००, फिरते पशु चिकित्सालय २४ गावात तीन हजार सहाशे असे एकूण २०६ गावासाठी ५२,००० लस प्राप्त झाले आहे.
संपूर्ण तालुक्यात चार पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरलेले आहेत यामध्ये दूधमाळा, पेंढरी, मोहली, धानोरा तर चार वर १२ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार यामध्ये दूधमाळा, येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मेंढाटोला व दूधमाळा अशे दोन्ही दवाखाने मिळून १७ गावे आहेत, पेंढरी पशुवैद्यकीय दवाखाना, मध्ये चातगाव, गोडलवाही, कारवाफा, झाडापापडा, व फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय असे एकूण ८८ गावे आहेत, मोहली पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे रांगी, सुरसुंडी, मुरूमगाव, सावरगाव असे एकूण ५८ गावे आहेत, धानोरा येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चातगाव, येरकड, असे एकूण ३७ गावे आहेत. या आजाराबाबत व कमी कर्मचारी वर्ग असून सुद्धा कसे काय आपण नियोजन करता अशी माहिती विचारले असता त्यांनी आम्ही एक एक पशुवैद्यकीय दवाखाना व अंतर्गत येणाऱ्या गावात लस लावीत आहोत, आतापर्यंत ५२,००० लस दोन टप्यात प्राप्त झाले असून ३१,९०६ लस पशूंना लावण्यात आले आहे, उर्वरित २०,०९४ लस आपण जेवढ्या लवकर लाऊन होतील तेवढ्या लवकर लावण्याचा आमचे तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग सतत प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत तालुक्यात अशा प्रकारचा आजार नाहीच त्यामुळे शेतकऱ्यांना व पशुधनांना काळजी करण्याचे काही कारण नाही,अफवांवर बळी न पडता आपण लम्पी हा चर्मरोग असून यासाठी गोमाश्या पासून पशुचे संरक्षण करणे व सकाळ संध्याकाळ कडू लिंबा च्या पाड्या गोठ्यात जाळणे, ही लस मोफत असून प्रतिबंध लसीचा उपयोग आपण पशु साठी लावण्यास सहकार्य करावे, असे आवाहन बाळासाहेब काळे पशु वैद्यकीय अधिकारी (विस्तार) पंचायत समिती धानोरा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here