धानोरा : जे.एस.पी.एम. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

202

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २ ऑक्टोबर : स्थानिक जे.एस.पी.एम. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक भाविकदास करमनकर व महाविद्यालयाचे कर्मचारी भास्कर वाढनकर आणि इतर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि महात्मा गांधींचे विचार सामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचवता येईल याबद्दल मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले.
या कार्यक्रमाचे संचालन, आभार प्राध्यापक भाविकदास करमणकर यांनी मानले. या कार्यक्रमाला या महाविद्यालययाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here