– आमदार डॉ. होळी यांना तालुक्यातील नागरिकांची निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ नोव्हेंबर : तालुक्यात शालेय विद्यार्थी व खेळाडूना खेळाचा सराव करण्यासाठी क्रिडांगण नाही त्यामुळे धानोरा येथे क्रीडा संकुलाची मागणी वारंवार करूनही मंजूर करण्यात आले नाही. अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या खेळाडूंना सराव करणे गरजेचे आहे खेळाच्या माध्यमातून जीवनस्थर उंचावण्यासाठी तसेच तालुक्यात क्रीडा संकुलची नितांत गरज असतानाही याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष होत आहे. विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कुठेही क्रीडांगण नाही किंवा भव्य असे कार्यक्रमासाठी भल्या मोठ्या क्रीडा संकुलनाची गरज आहे. तालुक्यातील खेळाडूंची होनारी होरपळ थांबविण्यासाठी क्रीडा संकुल उभारण्याची मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा तसेच येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजूरी द्यावी. अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे धानोरा तालुक्यातील लोकांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी निवेदन देताना भाजप नेते साईनाथ साळवे, अनंत साळवे, महादेव गणोरकर, नगरसेविका वैशाली धाईत, नगरसेविका प्रतीक्षा गुंडावार, नगरसेवक संजीव कुंडू, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, जेष्ठ नेते गजानन साळवे, युवा नेते सारंग साळवे, राकेश खरवडे, घनश्याम मडावी, सुभाष खोबरे, करीम असानी, मंन्नालाल शेंद्रे, प्रकाश धाईत यांच्या सह धानोरा येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
डिसेंबर महिन्यापर्यंत आपण धानोरा वासीयांसाठी, क्रीडा संकुलासाठी निधी व वाढीव पाणीपुरवठ्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून घेऊ अशी हमी यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी निवेदकांना दिले.
