धानोरातील ११ गावात पेटली दारूमुक्तीची मशाल

141

-५५४ स्पर्धक उतरले मॅरेथॉनमध्ये
The गडविश्व
गडचिरोली, २३ नोव्हेंबर : धानोरा तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील विविध ११ गावांमध्ये मुक्तिपथ रन फॉर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव संघटनेच्या पुढाकारातून आयोजित स्पर्धेदरम्यान दारूमुक्तीची मशाल पेटवून एकूण ५५४ स्पर्धक मॅरेथॉनमध्ये उतरले होते.
गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी टिकविण्यासाठी गावागावातील मुक्तिपथ गाव संघटना प्रयत्न करीत आहे. यासाठी गावातील अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांना जागृत करण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहे. सोबतच विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुक्तिपथ अभियान व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गावागावात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत. धानोरा तालुक्यातील चिचोली , इरूपढोढरी , खरकाडी, कटेझरी, कोसमी, घोडेझरी, गट्टा, चिचोडा, मुंगणेर, ढोरगट्टा, मीचगावझाडा या ११ गावांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
विविध गावात आयोजित स्पर्धेत सहभागी एकूण ५५४ स्पर्धकांपैकी यशस्वी ठरलेल्या महिला, पुरुष, युवक व युवतींना मान्यवरांच्याहस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचे रूपांतर सभेत करून मुक्तिपथचे तालुका प्रतिनिधी अक्षय पेद्दीवार, भास्कर कड्यामी यांनी गावकऱ्यांना अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. सोबतच गावाने एक होऊन लढा उभारल्यास निश्चितच गाव दारूमुक्त होईल, असेही पटवून दिले. यावेळी ग्रापं सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य, पोलिस पाटील व गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ११ गावातील एकूण १२३० नागरिकांनी आपली हजेरी लावली होती.

#the gadvishva #gadchiroli #dhanora #muktipath #muktipath run for marathon #Darumukti #gadchiroli news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here