देसाईगंज येथे चोरट्यांचा धुमाकूळ : पुन्हा एक घरफोडी

239

– पत्रकारांच्या घरावरच मारला डल्ला
– कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
The गडविश्व
देसाईगंज : शहरातील वर्दळ असलेल्या गांधी वार्डात चोरट्यांनी पुन्हा एकदा घरफोडी करत अंदाजे २० हजरांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील गांधी वार्ड येथे वास्तव्यास असलेले लोकमतचे ग्रामीण पत्रकार अरुण राजगिरे हे स्वगावी चोप येथे आपल्या कुटुंबासोबत मुक्कामी गेले होते. दरम्यान घरात कोणीही नसतांना चोरट्यांनी मुख्य द्वार तोडून आतील रुम मधील कपाटे काढून त्यातील काही चिल्लर, काही पर्समधील नोटा तत्सम काही सोने चांदी असा अंदाजे २० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस स्टेशन देसाईगंज येथे तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून गांधी वार्डात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या आहे मात्र चोरांच्या हातात फाररशे काही लागले नाही. परंतु या घटनेने नागरिक भयभीत झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील शंकरपूर ते चोप मार्गावर एका सोने चांदी व्यापाराला लुटण्याचा प्रयत्न झाला होता त्यातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर मागील काही वर्षात शहरातील कपड्यांच्या भव्य दुकानात सुद्धा चोरी झाल्याचा प्रकार दिसून आला होता. एवढे सर्व होऊनही चोरीचे प्रमाण वाढतीवर असल्याने शहरात आशा टोळ्या सक्रिय असाव्यात असा अंदाज लावण्यात येत आहे. शहरात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी सुद्धा मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश मसराम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे हे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here