The गडविश्व
देसाईगंज : येथील युवक काँग्रेस कार्यालयात माता रमाई जयंती आज ७ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खडतर प्रवासात माता रमाई सावलीसारख्या उभ्या राहिल्या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांना खंबीरपणे साथ देत रमाबाईंनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले. अशा महान त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती देसाईगंज युवक काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. जयंती साजरी करतेवेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पिंकुभाऊ बावणे, माझी जिल्हा परिषद सदस्य नंदूभाऊ नरोटे, देसाईगंज युवक तालुका महासचिव पंकज चहांदे, तालुकाध्यक्षा आरती लाहिरी, शहराध्यक्षा यामिना कोसरे, महासचिव अनुसूचित जाती समिता नंदेश्वर, मनीषा टेटे, काजल शर्मा,मंदा पेंद्रे, राजू राऊत, जयराम रासेकर, ओबीसी शहराध्यक्ष नितीन घुले, युवक शहर सचिव विवेक गावळे, सुनील चिंचोळकर, राहुल सिडाम, भारत गराडे, भूमीत मोगरे, नरेश लिंगायत, युवराज उईके, अमन गुप्ता, कैलास बन्सोड, आकाश शिऊरकर, निखिल कुथे, सुरज सिडाम,मनोज मडावी व देसाईगंज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.