– आरोपी फरार, शोध घेण्यास देसाईगंज पोलिसांसमोर आव्हान
The गडविश्व
देसाईगंज : गडचिरोली जिल्हयातील अवैध धंदयांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतांना डीबी पथक देसाईंगंज यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अधारे धाड मारून देशी दारू व दुचाकी वाहनासह एकुण 1 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र यातील आरोपी रविंद्रसिंग उर्फ पप्पु बावरी (32) रा.आंबेडकर वार्ड देसाईगंज जि. गडचिरोली हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
गडचिरोल जिल्हात अनेक अवैध धंदयांना उत आले आहे. सदर अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतांना देसाईगंज पोलीसांनी 23 ते 30 जानेवारी दरम्यान धडक कारवाई करत दुचाकी वाहनासह 1 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्याचे आव्हान देसाईगंज पोलीसांसमोर उभे आहे.
सदर कारावाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समिर शेख, कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली.
सदर कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.