दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक : एकजण जागीच ठार

1712

-कुटुंबावर शोककळा
The गडविश्व
ता.प्र / सावली, २५ सप्टेंबर : दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील चिमढा नदी नजीक घडली. शुभम निलकंट नरुले (२३) रा. रुद्रापूर ता.सावली जि. चंद्रपूर असे अपघातातील मृतकाचे नाव आहे.
मृतक हा शिक्षण घेत होता. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास दुचाकीने जात असतांना चिमढा नदीजवळ समोरून वेगात येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने समोरून धडक दिली. भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला. तो कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा होता. अचानक झालेल्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून गावात शोककळा पसरली आहे. ©

(#chandrapur mul saoli chimdha accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here