– कोरची तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवैधरित्या दारूची विक्री केली जाते त्या गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना मुक्तीपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्यातर्फे पत्र देऊन गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात येणार आहे.
कोरची तालुका समितीची बैठक तहसीलदार सि.आर.भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटिका निळा किन्नाके, संवर्ग विकास अधिकारी फाये, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वाघमारे, नगरपंचायतीचे प्रतिनिधी कोतकोंडावार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे समन्वयक ईजामसाजी काटेंगे, प्रांजली मेश्राम उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील 28 ग्रामपंचायतच्या सरपंचांना व पोलिस पाटलांना गावातील दारू तात्काळ बंद करण्यासंदर्भातील तहसीलदारांचे पत्र देणे. आतापर्यंत 12 ग्रामपंचायत समित्या गठीत झाल्या असून उर्वरित 17 ग्रामपंचायत समित्या गठीत करणे व संबंधित ग्रापंने ठराव तालुका समितीला सादर करावे. नगरपंचायत व मुक्तिपथने समन्वयातून शहरातील विविध वार्डात समिती व शहर संघटना तयार करणे.पोलिस स्टेशन अंतर्गत गावातील दारूविक्री वर अंकुश लावणे. शिक्षण विभागाने शाळापूर्व तयारी दरम्यान रॅलीच्या माध्यमातून दारू व तंबाखू मुक्त गाव निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.