दारूविक्री केल्यास आकारणार ५ हजारांचा दंड

170

– चंदनखेडी ग्रापं समितीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली : गावात अवैध दारू विक्री करताना आढळून आल्यास ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून संबंधित विक्रेत्यावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चंदनखेडी मुक्तिपथ ग्रापं समितीने घेतला आहे.
चंदनखेडी येथील ग्रामपंचायत सभागृहात मुक्तिपथ ग्रापं समिती पुनर्गठित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध ठराव पारित करण्यात आले. यावेळी सरपंच इंदिरा बोरकुटे, ग्रामसेवक आर.एन. अलोणे, ग्रापं सदस्य हर्षा खेडेकार, शरद कोवे, कैलास मेश्राम, दादाजी कोवे, बंडू बोरकुटे, विलास खेडेकर, मंदाबाई म्हशाखेत्री, ज्योती कोवे, सतीश इटनकार, बंडू खेडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दारू विक्रेत्यांवर ५००० हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दारूविक्रेत्यांविरुधात अहिंसक कृती करण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी समितीचे कार्य, अधिकार व कायदे समजावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here