दारूचे व्यसन नको, ५० जणांनी घेतला उपचार 

307

-विविध गावात  शिबीर 
The गडविश्व
गडचिरोली :  जिल्ह्यातील रुग्णांना उपचाराची  सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तिपथ अभियानाच्यावतीने विविध गावात गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ५० रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूचे व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील शिबिरात १३ रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी प्रेरक विनोद पांडे यांनी केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक मयूर राऊत यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी माजी जिप सदस्या गीता कुमरे, मालेवाडा सरपंच अनुसया पेंदाम, उपसरपंच आनंद बोगा, पोलीस पाटील राकेश नागोसे, गाव संघटनेच्या सदस्यांसह ग्रापं कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. चिखली येथील १६ रुग्णांवर उपचार करण्यात आला. यशस्वीतेसाठी चिखलीचे सरपंच सविता कुमरे, पोलीस पाटील पौर्णिमा सोनटक्के, उपसरपंच बहेटवार, अंगणवाडी सेविका हर्षा प्रधान, नेहरू युवा केंद्र समन्वयक जयश्री प्रधान, ग्रापं कर्मचारी व गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. दोन्ही  शिबिरात समुपदेशन प्राजु गायकवाड यांनी केले. रुग्णांची केस हिस्ट्री प्रभाकर केरझळकर यांनी घेतली.
भामरागड शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मधील संघर्षनगर म्हणून ओळख असलेल्या वस्तीत व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी १० रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिष्ट्री संयोजिका पुजा येल्लुरकर यांनी घेतली. समुपदेशन साईनाथ मोहुर्ले यांनी केले. शिबीराचे नियोजन आबिद शेख यांनी केले. यावेळी माजी जिप सदस्य ऍड. लालसू नगोटी, बाजीराव वाचामी, सपना रामटेके उपस्थित होते. तसेच धानोरा तालुक्यातील कामतळा येथे येथे आयोजित शिबिराचा एकूण ११ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी  छत्रपती घवघवे  यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी गाव पाटील देवसाय गावडे, मणिराम आतला, लालसाय गावडे, रजीराम गावडे यांच्यासह गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here