दवंडी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

161

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ नोव्हेंबर : रांगी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरमोरी तालुक्यातील दवंडी येथे ११ नोव्हेंबर २०२२ रोजी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
आदिवासी विकास महामंडळ नाशिक चे संचालक दडमल यांच्या हस्ते किलो काट्याचे विधिवत पूजन करून धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सभासद शेतकऱ्यांनी आपले धान्य धान खरेदी केंद्रावरच आणून विकण्याचे आवाहन दडमल यांनी केले .
उद्घाटन प्रसंगी गडचिरोली प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार, उप प्रादेशिक व्यवस्थापक सोनवणे यासह सभापती सी. के. ताडाम, संचालक स.र. सहारे, भा.ह.भोयर, काले, बा.र. मडकाम, ना. पै . कुंमरे, सु.धा. मडावी, जा.ब .उसेंडी , एन. टी. टेभुर्णे, का.र.दुगा, श्रीमती सु.ली. मडावी, व्यवस्थापक व्हराडे, शिपाई आतला, चौकीदार निकुरे, सोबतच दवंडी खरेदी केंद्र अंतर्गत येणारे सर्व गावातील सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here