तंबाखूला चुना लावायला मागणे पडले महागात : हाणामारीत एकाचा मृत्यू

620

The गडविश्व
कोल्हापूर : विविध कारणाने आपण हाणामारी झाल्याचे बघितले असले किंवा ऐकले असेल. अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे. तंबाखू करीता चुना मागणे एकाला चांगलेच भारी पडल्याची घटना कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथे येथे घडली. तंबाखूसाठी चुना मागितल्याने एका व्यक्तीची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अनिल रामचंद्र बारड असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार या दोघांकडे अनिल बारड यांनी तंबाखूसाठी चुना मागितला. चुना मागितल्यावरुन यांच्यात वाद सुरू झाला. शुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोप्याला गेला कि हामाणारी सुरू असतानाच एकाने चाकू खुपसला आणि त्यात अनिल रामचंद्र बारड चा मृत्यू झाला. या घटनेमुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here