– परीक्षा परिषदेकडून दोषींवर कायमची परीक्षा बंदी
The गडविश्व
पुणे, ४ ऑगस्ट : टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी कारवाई परीक्षा परिषदेकडून आली आहे . टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. या घोटाळ्यातील तब्बल ७ हजार ८७४ बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. या सर्व शिक्षकांना आता बेकायदेशीर ठरवले आहे . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (maharashtra state council of examiniation) कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे कळते.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
