टीईटी घोटाळा प्रकरण : आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त

404

The गडविश्व
पुणे : महाराष्ट्र परीक्षांच्या भरती घोटाळ्यात पुरता अडकून गेला आहे. म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टाने पाठवलेली ३०० बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ७ हजार ९०० जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता बोगस शिक्षकांची जेलची हवा पक्की झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here