झी महासेलच्या इमारतीला आग : लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

686

– सुदैवाने जीवीत हानी टळली, आग लागण्याचे कारण अस्पष्ट

The गडविश्व
गोंदिया : शहरातील शहरातील गोरेलाल चौकातील झी महासेलच्या इमारतीला आग लागल्याची घटना काल सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या आगीमध्ये झी महासेलचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया आणि तिरोडा अग्निशमन दलाची मदत घेतली गेली.
गोंदिया शहरातील गोरेलाल चौक परिसरातील एका हाँटेल लगत झी महासेल आहे. झी महासेलची इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. काल सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास या इमारतीतून धूर निघतांना काही नागरिकांना दिसले असता त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन दल आणि शहर पोलीस स्टेशन स्टेशनला दिली. त्यानंतर गोंदिया अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणि लगतच्या इमारतीना आग लागण्याची शक्यता वाढल्याने तिरोडा नगर परिषद अग्निशमन आणि अदानी वीज प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाची मदत घेण्यात आली. सांयकाळी ७ वाजतापर्यंत १५ अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाचा प्रयत्न करण्यात येत होते. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र यात झी महासेलचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here