जेप्रा येथे जागतिक कन्या दिवस साजरा

191

– मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा जि. प. उ. प्रा. शाळेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा अंतर्गत जेप्रा येथे जागतिक कन्यादिवस विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.
यात एक पात्री नाटक (विषय) मला माझे अधिकार द्या, पोस्टर बनविने या स्पर्धा घेण्यात आल्या व रॅली काढण्यात आली.
या स्पर्धेमध्ये एकूण ३१ मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.उ.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक बांबोले , प्रमुख अतिथी विषय शिक्षक भजे , सौ. रामटेके , सौ. हर्षे उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे उद्देश मुलींना त्यांचे शिक्षणाचे हक्क माहित व्हावे, मुलांना स्वतःचे व्यक्तीमत्व सादर करण्यासाठी आत्मविश्वास वाढवा, मुलांची शिक्षणाविषयी आत्मीयता वाढावी, मुलांना अभ्यासाचे महत्व कळावे, मुलींवर होणाऱ्या अत्याचारा बदल जागरूकता निर्माण व्हावी.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील दोन वर्षांपासून १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी”खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण” सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य,संघकार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे,स्व – व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण – संख्या ज्ञान व भाषा ज्ञान आदी क्षेत्रावर काम करीत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व गडचिरोली तालुक्याचे समन्वयक देवेंद्र हिरापुरे यांच्या सहकार्याने व जीवन कौशल्य शिक्षक लेखाराम हुलके, विषय शिक्षिका कु.रीना बांगरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here