जुनी पेन्शन विषयासंदर्भात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी भेट घेऊन पाठपुरावा करणार : आमदार बंटी भांगडीया

497

– जुनी पेन्शन संघटना तालुका चिमूरच्या पदाधिकाऱ्यांची आमदार बंटी भांगडीया यांच्याशी चर्चा

The गडविश्व
चिमूर : राजस्थान व छत्तीसगड राज्यात २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली त्याच धर्तीवर महारष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवावा याकरिता जुनी पेन्शन संघटना तालुका चिमूरच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बंटी भांगडीया यांची २५ मार्च रोजी भेट घेत निवेदन सादर केले. या दरम्यान विविध विषयांवर चर्चा सुद्धा करण्यात आली. यावेळी आमदार आमदार बंटी भांगडीया यांनी जुनी पेन्शन विषयासंदर्भात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी भेट घेऊन पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रात २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. : राजस्थान व छत्तीसगड राज्यात २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली मात्र महाराष्ट्रात का नाही असा सवाल सुद्धा करण्यात येत आहे तर अनेकदा जुनी पेन्शन संनघटनेच्या वतीने मागण्यासंदर्भात विविध निवेदने, आंदोलने करण्यात आले परंतु अद्यापही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत.
आमदार बंटी भांगडीया यांच्याशी भेटी दरम्यान जुनी पेन्शन संनघटनेचे तालुकाध्यक्ष केदार, कार्याध्यक्ष सरोज चौधरी, जिल्हा प्रतिनिधी पावडे, सचिव वैभव चौधरी तलाठी ठोंबर, पत्रुजी खाटे, गजभे मॅडम, प्रज्ञा पिसे मॅडम, पिसे मॅडम, अतुल महाजन, विनोद खाटे, बारेकर, केंद्रे , लोहकरे व आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here