जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला उपस्थिती

319

The गडविश्व
भामरागड, १७ ऑक्टोबर : तालुक्यातील मन्नेराजाराम येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बैद्ध समाज बांधवा कडून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्य राज्य घटनेचे शिल्पकार विश्वारत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी, भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष लालसू आत्राम, विष्णू मडावी, नरेंद्र गरगम,दसराय्या चांदेकर, रमेश झाडे, शामराव झाडे, दिनेश जुमडे, गणेश नागपूरवार, प्रमलर मडावी, चिन्नू सडमेक, व गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here